पिंपळगाव बसवंत: ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम सन २०२०-२०२१ मध्ये निफाड तालुक्यातील रक्कम रु.५९ लक्ष निधी खालील कामांना मंजुरी करण्यात आला आहे. या विकास कामामध्ये काथरगाव येथे आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे (रु.७.५० लक्ष), गोरठाण येथे नदीवर घाट बांधणे (रु.७.५० लक्ष), मुखेड येथे घाट बांधकाम करणे (रु.९.९९ लक्ष), नारायणगाव (खेरवाडी) येथे संरक्षक भिंत बांधणे (रु.७.५० लक्ष), नारायणगाव (खेरवाडी) येथे ड्युवेल हातपंप बसविणे व नळ पाणी पुरवठा करणे (रु.२.५० लक्ष), लालपाडी येथे आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे (रु.७.५० लक्ष), वावी येथे आदिवासी वस्तीमध्ये सभामंडप बांधकाम करणे (रु.१०.८३ लक्ष) व मुखेड येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे (रु.३.९० लक्ष) आदी विकासकामे मंजूर झाले आहे.