पिंपळगाव बसवंत: शासनाच्या माध्यमातून गावात विविध अभिनव उपक्रम राबविनाऱ्या निफाड तालुक्यातील उंबरखेड ग्रामपंचायतिस आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे. गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या उपस्थित उंबरखेड ग्रामपंचायतीस सोमवारी दि.(२रोजी) आयएसओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. निफाड तालुक्यातील उंबरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या पुढाकातून गावात शासनाच्या निधीतून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुखसोयी, हजार झाडांच्या वृक्ष लागवडीने गावात हरित क्रांती, दर्जेदार रस्ते, भूमिगत गटारी, कुपोषित बालकांवर योग्य उपचारामुळे शून्य आकडेवारी, राष्ट्रीय पेयजल योजना आदीं विकास कामांतुन उंबरखेडचे रुपडे पालटीत गावची विकासाभिमुख वाटचाल सुरू आहे.आयएसओ मानांकन प्राप्त प्रमाणपत्र स्वीकारताना उंबरखेडच्या सरपंच सीमा निरगुडे, उपसरपंच भाऊ घुमरे, सुभाष निरगुडे,रमेश निरगुडे, शिवाजी डोखळे, जयराम शिंदे,दत्तात्रय पानसरे, सुनीता डोखळे, रोहिणी पानसरे, दत्तू पानसरे, ग्रामविकास अधिकारी बी.पी.डांगे, आदी उपस्थित होते
आयएसओ मानांकनीत म्हणून ग्रामपंचायतीची ओळख
माजी आमदार अनिल कदम, जि प सदस्या ज्योती वाघले यांच्यासह पं स सदस्य राजेश पाटील यांच्या माध्यमातून उंबरखेड गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहे.गावात राबविलेल्या अनेक अभिनव उपक्रमांमुळे तालुक्यातील पहिले आयएसओ मानांकनीत ग्रामपंचायत म्हणून उंबरखेडची ओळख निर्माण झाली आहे.
भाऊ घुमरे, उपसरपंच उंबरखेड