पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र सरकारने आदिवासीसाठी शबरी घरकुल आवास योजना लागु केली आहे. या योजनेसाठी निफाड तालुक्यातुन अनेक घराचे प्रस्ताव संबंधी ग्रामपंचायतीने निफाड पंचायत समितीला पाठवले आहे. शिवाय अनेकांच्या घराची परझड झाली असून गळक्या घरावंर प्लास्टिक कागद टाकण्यात आले असल्याने तालुकास्तरावर शबरी घरकुल आवाससाठी २०२०-२१ वर्षातील उद्दिष्ट लवकरात लवकर प्राप्त करून देण्याची मागणी कारसुळ येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील अनेक गावाचे शबरी घरकुल आवाससाठी २०२०-२०२१ शबरी घरकुल आवास योजनेचे उदिष्ट तालुका स्तरावर लवकरात लवकर प्राप्त झाल्यास तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या घराची समस्या दूर होणार असल्याने शबरी आवास योजनेस लवकरात लवकर उद्दिष्ट प्राप्त करून न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.