पिंपळगाव बसवंत: सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील ऋणस्मृती फाउंडेशनच्या वतीने स्व. डॉ सुरज पाटील यांच्या स्मरणार्थ दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पिंपळगाव परिसरातील कोविड रुग्णांसाठी जनसेवार्थ अर्पित करण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण थांबल्याने हीच बाब हेरून येथील ऋणस्मृती फाउंडेशनतर्फे दोनऑक्सिजन मशीन जनसेवार्थ व ललित पाटील यांच्या सहकार्याने ना, नफा, ना तोटा तत्वावर पिंपळगाव बसवंत परिसरसतील रुग्णांसाठी ऑक्सिजन फिल्टरचा मेंटेनन्स म्हणून ३००० रुपये अनामत रक्कम व दीडशे रुपये प्रतिरोज असा उपलब्ध करण्यात आले आहे.
याप्रसंगी फाउंडेशनचे सुनील जगताप, सुधाकर कापडी, प्रदिप पटेल, आनंद मुंदडा, विलास विधाते, अजित शिंदे, दत्रातय जाधव, डॉ आरती गायकवाड, आदी उपस्थित होते.