पिंपळगाव बसवंत: कोरोना बाधित रुग्णांची सकारात्मक मानसिकता प्रबळ व्हावी, शरीर, मन तंदुरुस्त राहावे यास्तव भीमाशंकर कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना नियमित सकाळी योगाचे धडे दिले जात आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या संकल्पनेतून भीमाशंकर कोविड सेंटरमधील रुग्ण तातडीने बरे व्हावे व रुग्णांना अद्ययावत उपचारांबरोबरच रुग्णांची सकारात्मक मानसिकता प्रबळ व्हावी, शरीर, मन तंदुरुस्त राहावे तसेच कोरोना नंतरच्या म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला रुग्ण बळी पडू नये,यास्तव १५ मे पासून कोरोना बाधित रुग्णांकरीता नित्य योगा प्राणायाम ध्यान विज्ञान शिबिराचे सत्र योगशिक्षक संतोष शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.