पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील कारसूळ येथे पालखेड मंडळ विभागाच्या मंडळ आधिकारी शितल कुयटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षास भेट दिली. येथे कारसूळ, नारायण टेंभी व लोणवाडी येथील प्रथम लक्षणे दिसणारे रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णाची कुयटे यांनी विचारपुस करत तसेच येथील विलगीकरण कक्षातील सुविधा उपलब्धची माहिती घेत कारसूळ व नारायण टेंभी तील रुग्ण संख्येची तसेच लक्षीकरणाबाबत यावेळी माहिती घेतली.
यावेळी सरपंच आशा ताकाटे, उपसरपंच उज्ज्वला गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे, स्वाती काजळे, शामराव शंखपाळ, मनिषा काजळे, पुनम पगार, अमोल ताकाटे, भाऊसाहेब कंक, ग्रामसेवक राजेंद्र वाघ, तलाठी सिध्दांत वाघमारे, संतोष त्र्यंबके, क्लार्क सुरज शेख, शिपाई नंदु गांगुर्डे उपस्थित होते.
रुग्ण संख्या घटण्यास मदत होणार
निफाड तालुक्यातील रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे देवेंद्र काजळे व कारसूळ ग्रामस्थांनी लवकर समय सुचकता बाळगुन विलगीकरण कक्ष स्थापन केल्यामुळे परिसरातील रुग्ण संख्या घटण्यास मदत होणार आहे.
शितल कुयटे , मंडळ आधिकारी पालखेड विभाग