पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदे घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुभाजकाला धडकून पलटी झाल्याने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.
पिंपळगाव शहरातील जोपूळरोडहून बाजार समितीकडे कांदा घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एम एच ४१ जी २७३६ या वाहनावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुभाजकावर जाऊन पलटी झाल्याने वाहनातील चालक किरकोळ जखमी आहे. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रस्त्यावर अपघातात दुरापस्त झालेल्या वाहनास जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत रस्त्यावर पडलेला कांदा भरून देत मदतकार्य केले. जोपुळरोड परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहन अपघातांच्या घटना पहाता जोपूळ रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.