पिंपळगाव बसवंत: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे व शहर गटप्रमुख सागर कटाळे यांनी निफाडचे माजी आमदार अनिल कदम व मविप्र समाजाचे माजी संचालक दिलीप मोरे यांच्या प्रमूख उपस्थितीत शिवसेनेत शनिवार प्रवेश केला.
निफाड तालुक्यात मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले गिरीश कसबे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जायाचे, मनसेच्या माध्यमातून कसबे यांनी पिंपळगाव टोलनाक्यावरील विविध मुद्द्यांना हात घालत प्रश्न मार्गी लावले. तर शेतकरी सामान्यांसह मराठी मुद्द्यसह विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राळ उठविणा-या कसबे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची यापुर्वी पिंपळगावी मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख, त्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे विधानसभा अध्यक्षपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मनसेत नुकत्याच झालेल्या फेरबदलासह तालुका मनसेत अंतर्गत असलेल्या कलहाचे कारण देत गिरीश कसबे यांनी शिवसेनेची वाट धरल्याने तालुका मनसेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.