पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील चेहडी, श्रीरामपूर, सावळी, ब्राम्हणवाडे, व नागापूर या महसुली गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची लक्षवेधी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. निफाड तालुक्यातील चेहडी, श्रीरामपूर, सावळी, ब्राम्हणवाडे, व नागापूर आदी गावे आहेत. तालुक्यातील २०११ ची जनगणना बघता २०२१ची जनगणना होणे अपेक्षित असताना कोरोना अडसर ठरल्यामुळे ही होऊ न शकल्याने तालुक्यातील या पाच गावांची लोकसंख्या अजमितीत हजारांच्या आसपास येऊन ठेपली असल्याने तालुक्यातील या चेहडी, श्रीरामपूर, सावळी, ब्राम्हणवाडे, व नागापूर आदी महसुली गावात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची लक्षवेधी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. निफाड तालुक्यातील पाच गावांची लोकसंख्या बघून या गावांत ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी निश्चितच विचार करू असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.