पिंपळगाव बसवंत – पिंपळगावच्या टोल नाक्यावर स्वच्छता गृहाच्या आडोशाला काला-पिला हा तीन पत्ती सारखा जुगारटेबलावर सुरू असताना सटाणा येथील आश्रमशाळेतील शिक्षकाकडून सुमारे १९ हजार रुपये लुटल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. घाबरलेल्या या शिक्षकाने पिंपळगाव पोलीस तक्रार दिली आहे. मांडवडे हे चौगाव सटाणा येथील आश्रम शाळेतील शिक्षक आहे. ते फास्टटॅग घेण्यासाठी एका टॅग कंपनीच्या काउंटरला जाताना हा प्रकार घडला. या शिक्षकाला एकाने बळजबरीने टेबलवर हात ठेवून पैसे लावण्यास सांगितले. यावर त्यांनी नकार दिल्यावर दाम दुप्पटचे आमिष दाखवून त्यांना बारा का चौदा म्हणत एकाने दाटी वाटी वरून खिशात हात घालत सात हजार रुपये काढले. त्यांनी प्रतिकार करताच शेजारी दबा धरून बसलेल्या लाोकांनी घोळका करून मांडवडे यांचा मोबाईल हिसकावून आणखी बारा हजार रुपये घेतले.