पिंपळगाव बसवंत: निफाड येथील केद्राई कृषी व ग्रामविकास संस्थेचा सन २०२१ या वर्षीचा “केंद्राई भूषण पुरस्काने पिंपळगाव बसवंत येथील कवयित्री सरला मोते यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कार्ड्स संस्थाध्यक्ष वसंत शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन शिवाजी ढेपले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन होळकर, किसान क्रांती सेनेचे योगेश रायते, संकल्प सेवाभावी संस्थाध्यक्ष संजय आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.