पिंपळगाव बसवंत: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार यांनी मंगळवारी पिंपळगाव कोविड सेंटरसह ग्रामीण रुग्णालयाला भेट देत कोरोनाचा आढावा घेतला.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार यांनी पिंपळगाव कोविड सेंटरला भेट देत रुग्णसंख्येचा आढावा घेतला. कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या बाधित रुग्णांशी सोयी सुविधाबाबत पवार यांनी आपुलकीने संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. पिंपळगाव कोविड सेंटरसह ग्रामीण रुग्णालयात मागणीचा तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याने रूग्णांचे जीव टांगणीला लागल्याने कोविड सेंटरला वाढीव ऑक्सिजनच्या पुरवठा करण्यासह रुग्णांना आरोग्याच्या सुविधा कमी पडता, कामा नये, रुग्णांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना यावेळी सुलभा पवार यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या.