पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी, कामगारांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला रानवड सहकारी साखर कारखाना स्व अशोकराव बनकर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याने रानवड कारखाना कार्यस्थळावर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. निफाड तालुक्यातील रानवड सहकारी साखर कारखाना स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून १५ वर्षकरीता भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून सध्या या कारखान्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून कारखाना कार्यस्थळावर असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आला असून कारखान्याकडे जाणाऱ्या पालखेड-रानवड रस्ता ते रानवड-नांदुर्डी रस्ता कामाची आमदार दिलीप बनकर यांच्याकडून नुकतीच पाहणी करण्यात येऊन रस्त्याच्या बाबतीत आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना आमदार बनकरांनी केल्या आहेत.
काम प्रगतीपथावर …..
निफाड तालुक्यातील रानवड सहकारी कारखान्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या तीन महिन्यात कारखान्याची प्रत्यक्ष चिमणी पेटणार असल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे यांच्यासह पदाधिकारी देखील कारखान्याच्या कामात लक्ष घालून आहे.
वीज जोडणीची कामे पूर्ण…..
रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार दिलीप बनकर यांच्या पुढाकारातून व बनकर पतसंस्थेच्या सहकार्यातून नव्याने वीज जोडणीची कामे देखील पूर्ण झाली असल्याने येत्या हंगामात रासाका कार्यान्वित होणार आहे.