पिंपळगाव बसवंत: कर्जत येथील श्री अंबालीका व पुण्याच्या दौंड शुगर प्रा.ली.साखर कारखान्याला पिंपळगाव बसवंत येथील स्व अशोकराव बनकर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांच्यासमवेत भेट दिली. दौंड व अंबालीका कारखान्याची कार्यपद्धती व उत्पादनाच्या माहितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्ट मंडळाला मार्गदर्शन केले. स्व अशोकराव बनकर पतसंस्थेने १५ वर्षकिरीता भाडेतत्त्वावर घेतलेल्या रानवड सहकारी साखर कारखाना येत्या हंगामात सुरू करण्यासाठी देखभाल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रासाकाला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्यासह बनकर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खूणगाठ बांधल्याने त्याचा पार्श्वभूमीवर अशोकराव बनकर पतसंस्थेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व असलेल्या अंबालिका व दौंड कारखान्यास भेट देत ६०० कामगारांच्या माध्यमातून दहा हजार टनांचे दररोज ऊस गाळप, फळबाग प्रकल्प, शेततळी, डिस्लरी, इथेनॉल प्रकल्प, आदींची शिष्टमंडळाने पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, चंद्रकांत राका, उमेश जैन, बाळासाहेब भुतडा, रवींद्र आवारे,अरुण घोटेकर, अविनाश बनकर, प्रमोद कुटे, पुंडलिक घोलप, आदी उपस्थित होते.