पिंपळगाव बसवंत: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पिंपळगाव बसवंत शहरात तीन ऑक्सिजन प्लांट येत्या पंधरा दिवसात कार्यान्वित होणार असल्याने रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत आहे. निफाड तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी निफाडचे आमदार यांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यास्तव तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात एकूण तीन, ऑक्सिजन प्लांटचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने तालुक्यातील रुग्णांना या प्लांटच्या माध्यमातून मुबलक ऑक्सिजन मिळणार आहे.
असे आहे ५ ऑक्सिजन प्लांट
निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून ५ ऑक्सिजन प्लांट येत्या काही दिवसात कार्यान्वित होणार आहे.यात तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ३, लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील १, व निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील १ अशा ५ प्लांटचा समावेश आहे .
रुग्णांची होणारी गैरसोय टळणार
निफाड तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता तालुक्यात एकूण पाच ऑक्सिजन प्लांट येत्या काही दिवसात उपलब्ध होणार असल्याने ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे.
दिलीप बनकर, आमदार निफाड