पिंपळगाव बसवंत: आशिया खंडात नावलौकिक प्राप्त असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने निफाड तालुक्यातील १६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ हजारांच्या धनादेशाचे वाटप निफाडचे आमदार, सभापती दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधत आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत व माझी वसुंधरा योजनेत पुरस्कार प्राप्त संस्थांचा सत्कार समारंभ कार्यक्रमप्रसंगी निफाडच्या प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, कृषी अधिकारी भटू पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, निफाड पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी गादड, तालुका वैद्यकीय अधीक्षक रोहन मोरे, निफाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा श्रिया देवचक्के, पिंपळगावच्या सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक रामभाऊ माळोदे, नंदू सांगळे, निवृत्ती धनवटे, जि प सदस्य सिद्धार्थ वणारसे, प स सदस्य राजेश पाटील, राजेंद्र मोगल, बाळासाहेब बनकर, उमेश जैन, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, चंद्रकांत राका, रवींद्र मोरे, अश्विनी मोगल, विश्वास मोरे, सदस्य संजय मोरे, गणेश बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, सचिव बाळासाहेब बाजारे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
आमदार दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत निफाड तालुक्यातील १६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ हजारांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात मंगेश सहाने, शुभांगी कोल्हे, अर्चना माळोदे, रोहित शिंदे, सत्यभामा घंगाळे, छाया कुंभारडे, सुमन तांबे, जयश्री शिंदे, इंदूबाई वाटपाडे, रुपाली शिंदे, अलका पगार, सखुबाई कुटे, हिराबाई खालकर, प्रियांका गायखे, मनीषा कदम, गायत्री विधाते, या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारसांना बाजार समितीच्या वतीने प्रत्येकी २५ हजारांचे धनादेश वाटप झाले.
नऊ ट्रॅक्टर व इतर यांत्रिकीकरणाचे वितरण
कृषी दिनाचे औचित्य साधत कृषी संजीवनी योजने अंतर्गत अनुदानित ९ ट्रॅक्टर व इतर यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांना निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह तालुका कृषी व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थित वितरण करण्यात आले.
….
माझी वसुंधरा अंतर्गत सत्कार…..
माझी वसुंधरा अभियानात राज्यात सर्वोकृष्ट ठरलेल्या पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सरपंच, अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्यासह माझी वसुंधरा अभियानात निफाड नगरपंचायतिने राज्यात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केल्याने नगराध्यक्षा श्रिया देवचक्के आदींचा आमदार बनकरांच्या उपस्थित यथोचीत सत्कार करण्यात आला.
…..
पंधरा दिवसात ऑक्सिजन प्लांट होणार कार्यान्वित….
तिसऱ्या लाटेपूर्वीच पिंपळगाव बसवंत शहरात येत्या १५ दिवसात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार असल्याने तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तिसऱ्या लाटेत एकही रुग्ण दगावणार नाही या दृष्टीने सर्वांनी काम करण्याच्या सूचना आमदार बनकरांनी यावेळी केल्या.