पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहर सराफ असोसिएशनच्या नुतन अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वडनेरे यांची तर उपाध्यक्षपदी परेश बाविस्कर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पिंपळगाव सराफ असोसिएशनची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
यात अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वडनेरे, उपाध्यक्षपदी परेश बाविस्कर, सचिवपदी सर्वेश बिरारी, खजिनदारपदी प्रशांत दुसाने, सल्लागारपदी अमित थोरात आदींची निवड करण्यात आली आहे.सराफ असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष बाळासाहेब दुसाने यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सराफ असोसिएशनचे जेष्ठ जगन बाविस्कर, नंदकुमार दुसाने, महावीर चोपडा, संतोष सुकेणकर, अभय विभांडीक, भूषण पारख, सागर दुसाने, अनिल शेंडे, संदीप थोरात, सचिन कदम, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.