पिंपळगाव बसवंत: कोरोना रुग्णांसाठी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या संकल्पनेतुन पिंपळगाव बसवंत शहरातील जोपूळ रोडवरील भीमाशंकर शाळेत सुरू करण्यात आलेल्या ७५ ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडले
निफाड तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढ असल्याने निफाड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमेडिसीवर इंजेक्शनसह लसीचा वाढीव पुरवठा करण्याची मागणी ऑनलाइन उदघाटन प्रसंगी आमदार बनकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.
यावेळी जि प अध्यक्ष, बाळासाहेब क्षीरसागर,उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, तालुका वैद्यकीय अधीक्षक रोहन मोरे, सुरेश खोडे, विश्वास मोरे, सरपंच अलका बनकर, जि प सदस्या मंदाकिनी बनकर, ग्रामपालिका उपसरपंच सुहास मोरे, संजय मोरे, गणेश बनकर, शरद काळे, बाळासाहेब बनकर, सोहनलाल भंडारी, उमेश जैन, नंदू सांगळे, राजेंद्र बोरगुडे, अल्पेश पारख, आदी मान्यवर उपस्थित होते.