पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत पवन नगर भागातून जाणारा पालखेड डावा कालव्या लगत अनोळखी ४० वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. याबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव बसवंत शहरातील पालखेड डावा लगत अत्यंत अडचणीच्या ठिकाणी पाटाच्या लगत वाढलेल्या झुडपातील बोरीच्या झाडाला साडीने एका ४० वर्षीय अनोळखी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरचा प्रकार दुपारी दोन वाजेच्या सुमारास येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमुळे निदर्शनास आला.स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क करून अग्निशमन दलाचे कर्मचारी व पोलीसांनी महिलेचा मृतदेह काढून पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या बाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस.काॅ. प्रमोद देवरे, राकेश धोंगडे अधिक तपास करत आहे.