पिंपळगाव बसवंत: सतत या, ना, त्या कारणाने चर्चेत असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर गत काही दिवसांपूर्वी टोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून दोन महिला कर्मचाऱ्यांकडून महिला डॉक्टर प्रवासीला बेदम मारहाण केल्याची घटना सोशल माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून समोर आल्याने पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबत अधिक माहिती अशी की, गेल्या ३१ मे रोजी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल भरण्यावरून, व शंभराची दिलेली नोट फाटकी असल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन महिला कर्मचारी, व तरुणी वाहनचालक यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र टोलनाक्यावर रात्रपाळीस कामास असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्या वाहन चालक डॅाक्टर युवतीस शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. पिंपळगाव बसवंत शहरातील शिवसैनिकांनी या घटनेची गंभीर दखल घेत थेट पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन गाठल्याने टोल व्यवस्थापक योगेश सिंग यांनी तातडीने सदर महिला कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याने हा वाद मिटला होता. मात्र पिंपळगाव टोलनाक्यावर युवतीस मारहाण झाल्याचा व्हिडीओ घटना घडून १३ दिवसांनी सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत पिंपळगावकरांत संतापाची लाट उसळली आहे.
महिला कर्मचाऱ्यांचे निलंबन केले
पिंपळगाव टोलनाक्यावर गेल्या १३ दिवसांपूर्वी महिला कर्मचाऱ्यांकडून महिला डॉक्टर प्रवासीस मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन मारहाण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
योगेश सिंग, टोल व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!