पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास विभागामार्फत रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम या योजने अंतर्गत १ कोटी १५ लक्षचा निधी खालील विकास कामांसाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
या विकास कामांमध्ये रामा २३ ते मोरे वस्ती रानमळा रस्ता दुरुस्ती करणे. ग्रामा १३१ (रु.२० लक्ष), राममा ३ (जंगम हॉटेल) ते आहेरगाव (निफाडे वस्ती) रस्त्याची सुधारणा करणे. ग्रामा १९३ (रु.२० लक्ष), मौजे सुकेणे ते प्ररामा २ रस्त्याची सुधारणा करणे. ग्रामा ११३ (रु.२० लक्ष), प्रजिमा ४९ करंजगाव फाटा ते सोनगाव रस्ता दुरुस्ती करणे. ग्रामा १४८ (रु.४० लक्ष), दावचवाडी ते कुंभारी रस्त्याची सुधारणा करणे (रु.१५ लक्ष) आदी विकास कामे मंजूर झालेली असून यामुळे मतदार संघातील विविध भागातील दळणवळणाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. सदर कामे मंजूरीकामी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री छगन भुजबळ, व प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असून निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने आमदार दिलीप बनकर यांनी आभार व्यक्त केले.