पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात जनता कर्फ्यु लागू असताना देखील शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३२ नागरिकांच्या पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या.
यातील तीन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांची कोविड सेंटरला रवानगी करण्यात आली. पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ३० एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असताना देखील शहरात अनावश्यक व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी बघता पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील बहुतांश ठिकाणी २५ होमगार्ड व पोलीस कर्मचारी यांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येऊन शहरातील निफाड फाटा परिसरात आरोग्य विभागाच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या तब्बल ३२ नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या. यातील तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांची कोविड सेंटरला रवानगी करण्यात आली.
रॅपिड टेस्टप्रसंगी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, सहायक निरीक्षण कुणाल सपकाळे, आरोग्य विभागाचे शिरीन मांडे, पोलीस कर्मचारी संदीप दराडे, दुर्गेश बैरागी, पंडित वाघ, प्रकाश रिकामे, मनोज बोराळे, राकेश धोंगडे, आदिंसह होमगार्ड उपस्थित होते.
यांच्या झाल्या टेस्ट
पिंपळगाव शहरातील अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या मेडिकल व्यवसायिक, भाजीपाला, विक्रेते, फळे व दूध, विक्रेते यांच्यासह शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पिंपळगाव पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने निफाड फाटा परिसरात रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.
…..
घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे
शहरातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या सर्वांची आता टेस्ट केली जाणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या नागरिकांची थेट पिंपळगाव कोविड सेंटरला रवानगी करण्यात येणार असल्याने पिंपळगावकरांनी सुरक्षीतेच्या दृष्टीने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे
भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव ब