पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर आज दुपारी जलसा हॅाटेलजवळ मारुती गाडी पलटी होऊन अपघात झाला. या मारुती कंपनीच्या वाहनाचा क्रमांक MH15 02 C P 2996 हा आहे. या अपघातात शिरपूर येथील चार जण जखमी झाले असून त्यात सायली तारकेश दिक्षित (३०), ओमकार तारकेश दिक्षित (८), अरविंद मनोहर जोशी (६०), आशा अरविंद जोशी (५५) यांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती फोनवर मिळताच शिरवाडे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर पेशंटला ओम् हॅास्पिटल पिंपळगाव येथे दाखल करण्यात आले.