पिंपळगाव बसवंत: कोरोनाकाळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य शहरातून गावात, अन गावातून घराघरांत पोहोचवित शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबवावे, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची सज्ज होण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील केले.
पिंपळगाव बसवंत शहरात शिवसंपर्क अभियान अंतर्गत पिंपळगाव व उंबरखेड गणाच्या बैठकीप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, तालुकासह संपर्कप्रमुख किरण लभडे, तालुका समनव्यक आशिष बागुल, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, शहरप्रमुख नितीन बनकर, अनिकेत कुटे, भाऊ घुमरे, रमेश निरगुडे, नकुल शिंदे, अमोल जाधव, केशव बनकर, माधव बनकर,नाना जाधव, समाधान अहिरे, सागर झोमन, रुपेश शिंदे, सोनू बोरसे, दीपक पुंड, आदी उपस्थित होते. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासून कामाला लागावे, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून युवा शिलेदारांची दमदार फळी उभारित शासनाच्या योजना तालुक्यातील गोरगरीबांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी केले.