पिंपळगाव बसवंत: कोकणात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड कोल्हापूर, सांगली, चिपळूण आदी भागांमध्ये हाहाकार घातला आहे. यात हजारोंच्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले, अनेकांचे संसार पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी या गावातील २५६ कुटूंबाना घरगुती वापराचे भांडे रवाना करत एक हात मदतीचा दिला आहे.
कोकण, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागात पूर परिस्थिने होत्याचे नव्हते करून टाकले, घरांसह शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नागरिक अक्षरशः रस्त्यावर आल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात मदत होत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदार आमदार ,जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष हे आपआपल्या परीने कोकणातील नागरिकांना वस्तू स्वरूपात मदत पाठवत आहे. निफाडचे आमदार दिलीपराव बनकर सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी नामदार अदिती तटकरे यांच्या मागणीनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुतारवाडी या गावातील २५६ कुटूंबाना प्रत्येकी ४ ताटे, ४ वाट्या, ४ डिश, ४ ग्लास, ४ चमचे, १ तवा, १ उलथनी, १ पळी, १ चहाचे भांडे, १ भाजीचे भांडे, १ २ डबे, ६ चहाचे कप असा संपूर्ण १ कुटुंबांचा सेट वाटप करण्यात येणार आहे. सदर वस्तू घेऊन बुधवार ४ ऑगस्ट रोजी वाहन रायगडकडे रवाना करण्यात आले या प्रसंगी आमदार दिलीप बनकर ,तानाजी बनकर ,सुरेश खोडे , बाळासाहेब बनकर ,विश्वास मोरे,संजय मोरे ,रामभाऊ माळोदे,गणेश बनकर,संपत विधाते नंदकुमार सांगळे ,विजय देशमाने ,साहेबराव देशमाने,चंद्रकांत राका , राजेंद्र खोडे ,बापू कडाळे, रवींद्र आवारे शकील मोगल ,बाळासाहेब भुतडा ,उमेद जैन ,बाळा बनकर ,आदीजन उपस्थित होते