पिंपळगाव बसवंत- सामाजिक कार्यात भरीव योगदान राहिलेल्या धर्मवीर स्व.राजेंद्र मोरे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणार्थ पिंपळगाव बसवंत शहरातील दगुनाना मोरे नगर मधील तुळजाभवानी मंदिर सभागृहात शनिवार ३१ रोजी कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित रक्तदान शिबिरातून २५२ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. प्रारंभी धर्मवीर राजेंद्र मोरे यांच्या ११ व्या, पुण्यस्मराणा निमित्त मान्यवरांच्या उपस्थित प्रतिमपूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप बनकर, जि प सदस्या अमृता पवार, राजेंद्र मोगल, नितीन ठाकरे, यतीन कदम, सुरेश बाबा पाटील, दिलीप मोरे, सुरेश खोडे, विश्वास मोरे, उल्हास मोरे,रवींद्र मोरे, बाळासाहेब बनकर, सोमनाथ मोरे, प स सदस्य राजेश पाटील, संजय मोरे, सतीश मोरे, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, राजेंद्र खोडे, गीतेश बनकर, मनसेचे संजय मोरे, अल्पेश पारख, अशोक मोरे,किरण संधान, सुहास शिंदे, दिलीप दिघे, प्रशांत मोरे, गणेश मोरे, निखिल मोरे, दीपक विधाते, महेंद्र शिंदे, बाळा बनकर, गोविंद कुशारे, राहुल बनकर, चेतन मोरे, रोशन मुंदडा, आदिंसह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते.