पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिंपळगाव बसवंत येते HDFC बँकच्या मागे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर अग्नीशामक दल घटना स्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु आहे.
सकाळी ११ वाजता महामार्ग लगत बाबा मंगल कार्यालया समोर असलेल्या भेळ भत्ता बनविण्याच्या गोडाऊनला आग लागली. त्यानंतर या आगीने काही क्षणात मोठा पेट घेतला. शेजारी रद्दी व बांबुची दुकान असल्याने आगीन रौद्र रुप धारण केले. नाशिक, ओझर, निफाड, दिंडोरीसह आदी ठिकाणाहून अग्निशमन दलाचे बंब ही आग विझवण्यासाठी दाखल झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
https://www.facebook.com/share/r/1HFpy47Wd7