पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी नाशिक ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दिवंगत मानस उर्फ बॉनी पगार यांच्या पिंपळगाव स्थित निवासस्थानी कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेत मानस पगार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मानस पगार यांच्या अकाली निधन मनाला चटका लावणारे असून युवक काँग्रेसचा तरुण सहकारी हरपल्याने त्याची उणीव कायम भासत राहील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत मानस पगार यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय पगार कटुंबियांतील सदस्यांना आगामी काळात जी काही मदत लागेल ती उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार रोहित पवार यांनी भेटी दरम्यान दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सचिन पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, जिल्हा सरचिटणीस दिनेश धात्रक, कळवण बाजारसमितीचे सभापती हेमंत बोरसे, माजी जि प सदस्य भास्कर भगरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष भूषण शिंदे, अतुल पाटील, तालुकाध्यक्ष नाशिक गणेश गायधनी, राहुल ढोमसे, माजी जि प सदस्य भास्कर भगरे, योगेश गोसावी, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.