पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांचा मुसक्या आवळण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन गजाआड करण्यात यश आले आहे.सदर आरोपी येवला येथे सध्या राहत असून ते हरियाणा व राज्यस्थान येथील मूळ रहिवाशी आहे.
पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड येथे राहणाऱ्या दिलीप नथु पाटील संधान यांची सफेद रंगाची महिंद्रा पिकअप बोलोरो एम एच १५ सी के .९९४७ गुरुवार ३ जून रोजी चोरी झाल्याची तक्रार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल नितीन जाधव, मिथुन घोडके,संदीप दराडे, राकेश धोंगडे यांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली असता एका गुप्त महितीदाराने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना पिकअप जात असल्याची माहिती दिली तात्काळ पोलीस कर्मचारी नितीन जाधव ,मिथुन घोडके,संदीप दराडे,राकेश धोंगडे त्यांचा शोध घेण्यासाठी धाव घेतली असता सदर पिकअप चोरटे पोलिसांना बघताच पिकअप घेऊन पळून जाऊ लागले तेव्हा सिनेस्टाईल ने पाठलाग करत अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नाने चोरट्याना ताब्यात घेतले व गजाआड केले आहे.
…