पिंपळगाव बसवंत: नवरात्री उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीत सणात जत्रेसह दांडियास परवानगी नाकारण्यात आल्याने यंदाचा नवरात्री उत्सवाचा सण पिंपळगावकरांनी शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी केले. आगामी नवरात्री उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पटारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वीज वितरण सहायक अभियंता नितीन पगार, शहर मुस्लिम मिटीचे अध्यक्ष गफ्फार शेख, अब्दुल्ला शहा, मंदिराचे प्रमुख ललित जोशी,ग्राम पंचायत सदस्य अल्पेश पारख, दीपक विधाते, आदी उपस्थित होते.
पिंपळगाव बसवंत शहरातील ग्रामदैवत असलेल्या जगदंबामाता मंदिर, संतोषी माता मंदिर, तुळजाभवानी मंदिरात देखील देवीच्या मंदिरात पुजारी बांधवांकडून विधीवीत पूजा आरती करण्यास परवानगी आहे. याबत पुजारी बांधवांकडून मंदिरा बाहेर तसा फलक लावले बंधनकारक आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात व शहरात गरबा, दांडिया,कीर्तन, भजन आदींचे आयोजन करण्यास बंदी आहे. शिवाय मंदिराबाहेर नारळ,फुले खाद्य पदार्थ आणि खेळणी विक्रीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.नियम पायदळी तुडवणाऱ्याना कायदेशीर कारवाईचा इशारा पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आला आहे.