पिंपळगाव बसवंत: लसीकरणासाठी लागलेल्या रांगा, केंद्रावर तुडुंब गर्दी, रोजंदारीची लगबग अशा एक ना अनेक कारणांमुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या समस्त पिंपळगावकर, नागरिकांसाठी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या पुढाकारातून शहरात मंगळवार १४ पासून वार्डनिहाय विशेष लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करून प्रारंभ करण्यात झाला आठवड्यात ५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा मानस असून शहरात चार दिवसात तब्बल ५१०० नागरिकांचे विक्रमी लसीकरण पार पडले.
ग्रामपालिकेच्या वतीने शहरातील भाऊ नगरसह अंबिका नगर जि प शाळेत आयोजित विशेष लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, विश्वास मोरे, संजय मोरे, सतीश मोरे, बापू कडाळे,अल्पेश पारख, किरण लभडे, सोनाली विधाते, सुरेश गायकवाड,नंदू गांगुर्डे,रुक्मिणी मोरे, अलका वारडे, सत्यभामा बनकर, शितल मोरे, रामकृष्ण खोडे, बाळा बनकर, आरोग्य सहायक शरद तिडके, आदिंसह वैद्यकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कोरोनाचा काळात पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने शहरात जनजागृती मोहिमेसह अनेक अभिनव उपक्रम राबविले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील सोन्यासारखी माणसे माणसे काळाच्या पडद्याड गेली, तिसऱ्या लाटेपूर्वीच लसीकरणकरून संरक्षित होण्यासाठी नागरिकांची गेल्या कित्येक दिवसांपासून लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीसह, तासन तास उभे राहून सुद्धा अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा फटका काही अंशी बसला असला तरी पिंपळगाव शहरातील झोपडपट्टी भागातील कष्टकरी समाज रोजंदारीमुळे वंचित राहिल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सदस्य गणेश बनकर यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून लसींचे डोस उपलब्ध करून शहरात वार्डनिहाय लसीकरण सुरू आहे
अवघ्या चार दिवसात जवळपास ५१०० नागरिकांनी लसीकरण पार पडल्याने नागरिकांना दिलासा लाभत आहे.
ग्रामपालिकेच्या कौतुक….
आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून पिंपळगाव ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर, सदस्य गणेश बनकर यांनी पाठपुरावा करून पिंपळगाव बसवंत शहरात वार्डनिहाय लसीकरण सुरू केल्याने गोर गरीब नागरिकांना दिलासा लाभत असल्याने पिंपळगावकरांकडून ग्रामपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट
पिंपळगाव शहरातील झोपडपट्टी भागातील कष्टकरी समाज रोजंदारीमुळे लसीकरणापासून वंचित राहिल्याने हीच बाब हेरून आमदार दिलीप बनकर यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहरात दररोज वार्डनिहाय विशेष लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून आठवड्यात पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव ब