पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहरातील तलाठी कार्यालयात २३ ते २५ जूनपर्यंत ठीक ११ वाजता, तीन दिवसीय सातबारा दुरुस्ती शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती तलाठी राकेश बच्छाव यांनी दिली.
विभागीय आयुक्त यांच्या आदेशनव्ये जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडलअधिकारी निळकंठ उगले यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय सातबारा दुरुस्ती शिबिरात संगणकीय सातबारा मधील चुका दुरुस्ती करणे, यांसह ऑनलाइन सातबारा व हस्तलिखित सातबारा याबत दुरुस्तीसाठी पिंपळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे