पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या भिमाशंकर कोरोना सेंटरला नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन पहाणी केली.यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक ऑक्सीजन काॅन्ससटेटर मशीनचे उदघाटनही केले.
या भेटीत पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, आ.दिलीप बनकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले आहे. त्यांनी स्वखर्चाने परदेशातून निफाड तालुका व भीमाशंकर केविड सेंटरसाठी इलेक्ट्रिक ऑक्सीजन काॅन्ससटेटर या मशीन आणले. भिमाशंकर कोरोना सेंटरची सर्व सुविधा बघता व अतिशय चांगले नियोजन केले आहे.शाळेतील इमारतीचा उपयोग करत आधुनिक व सुसज्ज असे अत्यंत कमी कालावधीत कोरोना सेंटर उभे करून जिल्ह्यात आदर्श करून दाखवला आहे. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सुसज्ज असे कोरोना सेंटर उभे केल्याचे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी यावेळी काढले. आ.दिलीप बनकर व त्याच्या सर्व टीमचे कौतुकही केले. यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले .पोलीस.नि.भाऊसाहेब पटारे. .रामभाऊ माळोदे, उमेद जैन, अविनाश बनकर आदि उपस्थित होते