नाशिक – व्हॉट्सअप पिंकच्या नावाचे मेसेजेस सध्या वेगवेगळ्या ग्रुपवर युझर्सच्या अजाणतेपणामुळे व्हायरल होत असून अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे. अशा लिंक क्लिक केल्यानंतर तुमचा फोन हॅक होवून मोबाईलचा वापर करणे अवघड होईल आणि असे झाल्यास तुमची वैयक्तीक तसेच बँकींग विषयीची गोपनीय माहीती चोरीला जावून तुमच्या खात्यावर डल्ला मारणे हॅकर्सला सोपे जावू शकते.या लिंकव्दारे व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गुगल किंवा अॅप्पलच्या अधिकृत प्ले स्टोअर अॅप इन्स्टॉल करावे. एपीके किंवा अन्य मोबाइल अॅप इन्स्टॉल करू नये किंवा अपडेट करु नये असा सल्ला सायबर तज्ञांकडून दिला जातोय.