पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत त्यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागून निधी गोळा केला असे वादग्रस्त विधान केले. त्याच्या निषेधार्थ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. या घटनेनंतर पाटील प्रचंड संतापले. आणि म्हणाले की, अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कारण चंद्रकांत पाटील यांनी कालच भाषण करताना महापुरुषांविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील आज दि. १० नोव्हेंबर रोजी पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. विशेष म्हणजे अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांनी आधीच होती. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही ही अनपेक्षित घटना घडली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस दलात देखील धावपळ उडाली. मात्र त्यानंतर पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक… #ChandrakantPatil pic.twitter.com/tHnYv87RHm
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) December 10, 2022
Pimpri Chinchwad Minister Chandrakant Patil Ink Throwing