पिंपळगाव बसवंत: विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरातील गावात बुधवार दि.(६) रोजी जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धा-पाऊण तास जोरदार झालेल्या पावसाने शहरातील जुना आग्रारोडसह उंबरखेड चौफुली उड्डाणपूल बोगद्यासह सर्व्हिसरोडवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पिंपळगाव शहरास परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पुनरागमन केले. अर्धा तासभर पडलेल्या मुसळधार पावसाने उंबरखेडचौफुली उड्डाणपूल बोगद्यासह शहरातील जुना आग्रा रोडवर गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी स्वारांना कसरत करत वाट काढावी लागली. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पिंपळगावकर नागरिकांची जोरदार पावसाने पुरती धांदळ उडवल्याने चित्र पहावयास मिळाले. शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरासह जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर पाणीच पाणी साचल्याने चित्र होते. मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लागवड केलेल्या सोयाबीन, टोमॅटो पिकास फटका बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.