नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका नेहमीच चर्चेत असतो. आताही तो चर्चेत आला आहे. निमित्त आहे ते टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि प्रवासी महिला यांच्यात तुफान हाणामारी झाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला आहे. आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाक्यावर एक कार आली. ही कार एका पोलिसाची होती. या पोलिसाने त्याचे आयकार्ड दाखवून टोलमधून सूट देण्याची विनंती केली. मात्र, ती नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे पर्यवसन भांडणात झाले. त्यानंतर टोल महिला कर्मचारी आणि पोलिस पत्नी यांच्यात हाणामारी झाली. आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे. टोल वरील सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला आहे. पण, सध्या या व्हिडिओमुळे हा टोल नाका चर्चेत आला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1570308349518024705?s=20&t=joykhj97B16mXSJy89pGxw
Nashik Pimpalgaon Toll Naka Women Fight Video Viral
NHAI