नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठेची आणि उत्तर महाराष्ट्रात उत्पन्नात प्रथम असलेली पिंपळगाव बसवंत बाजार समिती समितीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्यात लढत होती. त्यामुळे येथे कुणाची सरशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. शेतकरी विकास पॅनलला १८ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळाला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वातील लोकमान्य परिवर्तन पॅनलला बसला धक्का आहे. लोकमान्य परिवर्तन पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, एका जागेवर माजी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम हे अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652218327463505920?s=20
अंतिम निकाल असा
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती
एकूण जागा – १८
शेतकरी विकास पॅनल – ११
लोकमान्य परिवर्तन पॅनल – ६
अपक्ष उमेदवार – १
https://twitter.com/prash_dhumal/status/1652213045781987329?s=20
Pimpalgaon Baswant APMC Election Result Declared