पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खासकरुन भाजप नेते यतीन कदम, ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच फेरमतमोजणीवरुन मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले.
फेरमतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम हे धावून गेले. हे पाहून अनिल कदमही आक्रमक झाले. त्यानंतर अनिल कदम आणि यतीन कदम या काका-पुतण्यांमध्ये हाणामारी झाली. परिणामी, मतमोजणी केंद्रात काही वेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. दोन्ही नेत्यांना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अन्यथा दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्येही मोठा राडा झाला असता.
बघा, या घटनेचा व्हिडिओ
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652218327463505920?s=20
Pimpalgaon Baswant APMC Election Fight Between Kadam Uncle Nephew Video