इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा तालुक्यातील ताहाराबाद – अंतापूर मार्गावर गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणा-या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहे.
या अपघातातील मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी हे मजूर असून ते सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी आहे.
पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतांना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ताहाराबाद – अतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करुन जखमींना वाहनांव्दारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमीपैकी दोन मजुरांची प्रकृत्ती चिंताजनक आहे.