वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंग गडावर मालेगाव येथील दाभाडी येथून दर्शनासाठी जाणा-या वाहना वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पटली झाली. यात ३२ भाविक जखमी झाले आहे. चार भाविकांवर नांदुरी येथे उपचार सुरु आहेत तर उर्वरीत भाविकांवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास दाभाडी येथून पिकअपमधून हे भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी जात होते. नांदुरी ते सप्तशृंगगड हे अंतर दहा किलोमीटर असून सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व सदर पिकअप पलटी झाला. या घटनेची माहिती समजताच गडावरील नागरीक, सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही जखमीना नांदुरी येथे दाखल केले तर उर्वरीत रुग्णांना रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.









