नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार, दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सिटी सेंटर मॉल उंटवाडी नाशिक येथे दुपारी २ वाजता फुले चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली आहे.