नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुरूष हक्क संरक्षण समितीचे येत्या दि. २८ व २९ डिसेंबर रोजी धुळे येथे २७ वे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अन्यायकारक कायद्यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्यभरातील वकिल मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पुरूष हक्क संरक्षण समिती कुटूंबावर होणाऱ्या कायद्यावर मार्गदर्शन करीत आहे. कायद्यात बदलाची मागणी समितीने केली आहे.
देशात पुरूष आयोग निर्माण्यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. धुळे येथील कल्याण भुवन येथे शनिवारी (दि.२८) या अधिवेशनाचे उदघाटन होणार असून दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद होतील. यावेळी कुटूंबियांना कायदेशीर मार्गदर्शन केले जाणार जाईल.
या अधिवेशनाचे आयोजन धुळे जिल्हाध्यक्ष ॲड मधुकर भिसे यांनी केले असून यावेळी महिलांसाठी विशेष परिसंवाद होईल. अधिवेशनात मुंबईचे ॲड. रंजन राजगोर , डॉ. सुनिल घाडके , ॲड. धर्मेंद्र चव्हाण (नाशिक) ,ॲड.बाळासाहेब पाटील (सांगली),ॲड.शिवाजीराव कराळे (अहिल्यानगर) ॲड.संतोष शिंदे (पुणे) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.