बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुम्ही फोटोग्राफर आहात? मग, या स्पर्धेत नक्की सहभाग घ्या

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

by Gautam Sancheti
ऑगस्ट 13, 2021 | 6:00 pm
in मनोरंजन
0
E8ljA3gUUAYkRel 750x315 1

मुंबई – जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये फोटोग्राफी स्पर्धा, हेरिटेज वॉक, फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी आणि कथाकथन यावर आधारित ऑनलाईन कार्यशाळा असतील, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ११ ऑगस्टपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला (www.facebook.com/maharashtratourismofficial आणि www.instagram.com/maharashtratourismofficial) टॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता. फोटो अपलोड करताना तो वन्यजीव, लँडस्केप, साहस, निसर्ग, ग्रामीण आणि शहरी जीवन, वारसा, संस्कृती, खाद्य इत्यादी पुरताच मर्यादित असावा असे नाही. यामध्ये आपण आपली कल्पकता वापरू शकता, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

स्पर्धकाच्या फोटोग्राफीची अभिनव शैली, फ्रेमिंग, कॉम्पोझिशन, एडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही २० छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील.

जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर (www.instagram.com/maharashtratourismofficial) ऑनलाईन कार्यशाळा होईल. कार्यशाळेत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी ३० मिनिटांच्या असतील.

पर्यटन विकासाला चालना
यासंदर्भात पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या की, पर्यटनातील प्रत्येक नवीन उपक्रमासह आम्ही लोकांच्या जवळ जात आहोत. आम्ही यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धा घेतल्या आहेत. परंतु यावेळची थीम थोडी वेगळी आहे. यामध्ये कुठलीही विशिष्ट थीम न घेता, कल्पकतेला वाव देत, तुमच्या मनातील महाराष्ट्र टिपायचा आहे. यानिमित्ताने स्वतःच्या नजरेतून वेगळा महाराष्ट्र टिपलेल्या नवोदित छायाचित्रकारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत. मुंबई तिच्या धावपळीच्या आणि रात्रीच्या जीवनासाठी ओळखली जाते. त्यात भर घालत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने हेरिटेज वॉकसारखे उपक्रम सुरू करून हेरिटेजच्या पैलूलासुद्धा महत्त्व देत आहोत. मुंबईमध्ये अनेक वारसास्थळे आहेत, हेरिटेज वॉकद्वारे या स्थळांना भेट दिली जाईल. अशा उपक्रमांमधून महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले की, छायाचित्रण हे पूर्वीसारखे अवघड न राहता आता सोपे झाले असले तरी त्यातील बारकावे, कौशल्ये, प्रकाशयोजना, फोटोग्राफीची व्हिजन इत्यादी गोष्टी योग्य मार्गदर्शनाने साध्य करता येऊ शकतील. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने होत असलेले फोटोग्राफीचे विविध उपक्रम हे नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आहेत. यानिमित्ताने आयोजित होणारे विविध उपक्रम हे ज्ञान प्रदान करतीलच, पण त्याचसोबत फोटो काढताना विचारात घेतल्या जाणाऱ्या कोन, प्रकाशयोजन इत्यादी विविध पैलूंचा दृष्टीकोनही प्रदान करतील. शिवाय यानिमित्ताने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे नव्याने जगासमोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महावितरणकडून ३० युनिटपर्यंत वीजवापराची तपासणी; २२ हजार मीटरमध्ये अनियमितता

Next Post

‘ई-पीक पाहणी’ ॲप आहे तरी काय? त्याचा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Ndr dio E pik pahani 13 Aug 2021 2

‘ई-पीक पाहणी’ ॲप आहे तरी काय? त्याचा शेतकऱ्यांना फायदा कसा होणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011