नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे बिबटे रहिवासी भागात दिसल्याच्या घटना घडत आहेत. त्यातच बिबट्या नारळाच्या आणि निलगिरीच्या झाडावर चढल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहे. पण, आता बिबट्या थेट माणसांसमोर गप्प उभा असून त्याच्याबरोबर स्थानिक नागरिक सेल्फी घेत आहेत. तर काही जण बिबट्याच्या पाठीवरुन हात फिरवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हिडिओ सिन्नर तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे.
बघा हा व्हिडिओ
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/