इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याचा जमाना हा फोटोशूटचा आहे. त्यातही लग्नाचे फोटोशूट असेल तर ते विचारायलाच नको. सध्या सोशल मिडियात एक फोटोशूट भन्नाट चर्चेत आहे. ते म्हणजे नववधूचे लाल रंगाच्या साडीतील. पण, तुम्ही म्हणाल यात काय नवी आहे तर ते आहेत रस्त्यावरील खड्डे. हो नववधूने रस्त्यावरील खड्ड्यांच्या साक्षीने हे फोटोशूट केले आहे. त्याची सोशल मिडियात सध्या चांगलीच धूम आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, नववधूची वेशभूषा करुन एक सुंदर तरुणी खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरुन चालते आहे. रस्त्याची अवस्था इतकी वाईट दिसते आहे की लाल जोडे घातलेली नववधू सावधपणे एकेक पाऊल टाकताना दिसत आहे. खरं तर, नववधूला रस्त्याची परिस्थिती हायलाइट करायची होती आणि तिचे फोटोशूट संस्मरणीय बनवायचे होते. म्हणूनच त्यांनी ठरवले की सुंदर वादक किंवा कोणत्याही रोमँटिक पर्यटन स्थळावर फोटोशूट करण्यापेक्षा लग्नाचे शूट खराब रस्त्यावर केले पाहिजे. आणि आता ही भन्नाट आयडिया यशस्वी झाली आहे. सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडिओला फक्त लाइकच करत नाहीत तर रस्त्याच्या दुरवस्थेचीही चर्चा करत आहेत.
केरळच्या नववधूने लाल साडीत रस्त्यावरील खड्ड्यावर केलेल्या वॅाकचे फोटोशूट एरो वेडिंग कंपनीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला ४० लाखांपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. खड्ड्यांकडे लक्ष वेधण्याच्या फोटोग्राफरच्या कल्पनेचेही कौतुक होत आहे. या फोटोतून लग्नानंतरची वाट कशी असते असाही अर्थ काहींनी काढला आहे. पण, ते काही असले तरी या कल्पनेला मात्र सोशल मीडियातून चांगलीच दाद मिळाली आहे.
Kerala Viral Video Bride Wedding Photo Shoot Road Potholes
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD