शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात माझी माय गोदा माय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 12, 2022 | 5:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221112 WA0213 e1668252621339

 

रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स व सावाना तर्फे आयोजन
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदामाय हीच नाशिकची खरी ओळख असून तिचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना केल्या जातात.रोटरी सारख्या संस्थासुद्धा त्यात आपले बहुमोल योगदान देतात ही बाब स्तुत्य असून या पवित्र कार्यात सर्व नागरिकांनाही सहभागी करून घ्यावे,असे प्रतिपादन महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलर रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी माय गोदा माय”या थीम अंतर्गत छायाचित्र व चित्रकला स्पर्धेतील छायाचित्रे व चित्रांचे प्रदर्शन सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन करतांना पुलकुंडवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके,प्रमुख कार्यवाह डॉ.धर्माजी बोडके,रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष धनंजय बेळे,महंत भक्तीचरणदास, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सीमा पछाडे, सलीम बताडा, हेमंत खोंड,वैभव चावक,अजय चव्हाण, डॉ.अतुल वडगावकर,विराज पहाडे आदी होते. नाशिकनगरीला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.तो जोपासण्याचे काम महापालिका करीत आहे.शहर विकासाची जी कामे सुरू आहेत त्यावर नाशिककरांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि त्यात काही उणिवा असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्हाला त्यात सुधारणा करता येतील.गोदामाय प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून रोटरीने भरविलेल्या या प्रदर्शनामुळे देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत गोदेचे सौंदर्य आणि पावित्र्याबद्दल सकारात्मक संदेश जाईल,असा विश्वासही पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनीही आपल्या भाषणात नाशिकच्या गोदावरी नदीचे महात्म्य विशद करून तिच्या काठावरील काझीगढी आणि हनुमानगढीचा उल्लेख प्राचीन काळातही आढळतो याची आठवण करून दिली. सावानाचे कार्यालय पूर्वी सरकरवाड्यात होते.पूर आल्यानंतर सरकारवाडा आणि गोदेची भेट हमखास हमखास ठरलेलीच आणि आणि हे दृश्य विलोभनीय असेच असते असे सांगून गोदावरीचे महत्व विशद करणारी चित्रकला स्पर्धा सावानातर्फे दरवर्षी घेण्याची घोषणा प्रा.फडके यांनी केली तेव्हा सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

गोदावरीच्या देखभाल व स्वच्छतेबाबत विविध माध्यमातून उलट सुलट चर्चा होत असतांनाच तिचे विहंगम दृष्य लोकांसमोर मांडण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनातून ‘माझीमाय गोदमाय’ अशी अभिनव छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्याला उदंड प्रतिसाद लाभला.या प्रदर्शनामुळे गोदावरीचे सौंदर्य लोकांसमोर तर येईलच परंतु तिच्या स्वछता व संवर्धनाने महत्वही लोकांना पटेल,असे रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या जागृतीसाठी हे प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावेल,असा विश्वास महंत भक्तीचारणदास यांनी व्यक्त केला.अशाप्रकारचे प्रदर्शन कायमस्वरूपी भरवावे,अशी उपयुक्त सूचना रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सीमा पछाडे यांनी केला.यावेळी पोस्टमनच्या वेषभूषेत येऊन गोदामाय नाशिककरांना पत्ररुपाने काय सांगते याचे वाचन आपल्या खास शैलीत करून दत्तात्रेय कोठावदे यांनी सर्वांची मने जिंकली. यावेळी त्यांचा तसेच प्रदर्शनासाठी मोलाचे सहकार्य करणारे दीपक वर्मा यांचा आयुक्त पुलकुंडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास गिरीश नातू. देवदत्त जोशी,संजय करंजकर,सोमनाथ मुठाळ,प्रेरणा बेळे,गणेश बर्वे,राजेंद्र निकम,दिनेश देवरे,दिलीप अहिरे, सुरेश गायधनी, प्रा.ललित पगार,कैलास सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन विश्वास शिंपी यांनी केले.

प्रदर्शन कालावधी वाढला
खरे तर हे प्रदर्शन १२ आणि १३ नोव्हेंबर असे दोनच दिवस आयोजित करण्यात आले होते.मात्र ते चार दिवसांचे करावे अशी सूचना आयुक्त चंद्रशेखर पुलकुंडवार यांनी केली असता सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी ती मान्य केली.त्यामुळे आता हे प्रदर्शन मंगळवार १५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत जनतेसाठी विनामूल्य खुले राहील,असे आयोजकांनी सांगितले.याच बरोबरीने सार्वजनिक वाचनालयाचे वस्तुसंग्रहालय सुद्धा नाशिककर नागरिकांसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात आल्याचे वस्तुसंग्रहालय सचिव सौ प्रेरणा बेळे यांनी सांगितले. यावेळेस गोदावरी संवर्धनाची शपथ ही सर्व उपस्थित यांना देण्यात आली

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात महागाई नियंत्रणात का येत नाहीय? गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले…

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या तीन परीक्षांची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
MPSC e1699629806399

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या तीन परीक्षांची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011