मुंबई – तुम्ही जर फोन पे वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, अगदी १० रुपयाची वस्तू घेतली तरी फोन पे द्वारे पैसे देण्याची सवय आता अनेकांना लागली आहे. यापुढे फोन पे वापराचे की नाही, याचा निर्णय आता वापरकर्त्यांना घ्यावा लागणार आहे. कारण, फोन पे ने व्यवहार करणे आता महागले आहे.
वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे ने यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस द्वारे 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या मोबाइल रिचार्जसाठी प्रति व्यवहारासाठी आता 1 ते 2 रुपये प्रक्रिया शुल्काची जादा आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फोनपे वापरकर्त्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI ) आधारित व्यवहारासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करणारे कंपनी हे पहिले डिजिटल पेमेंट अॅप आहे.
वास्तविक सदर सेवा ही त्याच्या काही प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून मोफत दिली जात आहे. परंतु इतर कंपन्यांप्रमाणे, PhonePe देखील क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी प्रक्रिया शुल्क आकारत आहे. त्यामुळे आता फोन पे द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना यासंबंधी आर्थिक विचार करावा लागणार आहे. या नव्या नियमांविषयी माहिती देताना फोन पे च्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही रिचार्ज संदर्भात छोट्या प्रमाणावर प्रयोग करत आहोत. या अंतर्गत काही वापरकर्ते मोबाईल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. सुमारे 50 रुपयांखालील रिचार्जवर कोणतेही शुल्क नाही, त्याचप्रमाणे 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये आणि 100 रुपयांच्या वरच्या रिचार्जवर 2 रुपये शुल्क नाही.
तसेच फोनपेचे प्रवक्ते म्हणाले की, एक प्रयोग म्हणून, बहुतेक मोबाईल अॅप वापरकर्ते काहीही देत नाहीत किंवा 1 रुपये अजिबात देत नाहीत. परंतु हा नियम पाळणे सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे. कारण आपण कोणतीही सेवा घेतो, तेव्हा त्याचे शुल्क देतोच. त्यामुळे सेवा मुल्य किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर नियमावली पाळणे महत्त्वाचे ठरते थर्ड पार्टी (तृतीय पक्ष ) म्हणून, अॅपमध्ये UPI व्यवहारांच्या बाबतीत फोनपेचा सर्वात मोठा वाटा आहे. फोनपे कंपनीने सप्टेंबरमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटीहून अधिक UPI व्यवहारांची नोंद केली होती.