मुंबई – फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महासीईटीने फार्मसीच्या प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तेव्हापासून या प्रवेश प्रक्रियेची प्रतिक्षा विद्यार्थी करीत होते. अखेर वेळापत्रक जाहीर झाले असून आता बी फार्मसी आणि डी फार्मसी या दोन्ही वर्षांचे प्रवेश होऊ शकणार आहेत.
जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, १२ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी https://ph2021.mahacet.org/StaticPages/frmImportantDates या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. पहिली गुणवत्ता यादी २४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
फार्मसी अभ्यासक्रमासाठी नोंदणी – 12 ते 21 नोव्हेंबर
पहिली गुणवत्ता यादी जाहीर – 24 नोव्हेंबर
पहिल्या गुणवत्ता यादीवरील आक्षेप – 25 ते 27 नोव्हेंबर
अंतिम गुणवताता यादी – 28 नोव्हेंबर
महाविद्यालय पसंतीक्रम – 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
प्रवेश निश्चिती – 4 ते 6 डिसेंबर
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे – 7 डिसेंबर
महाविद्यालय प्राधान्य क्रम भरणे – 8 ते 10 डिसेंबर
प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करणे – 13 ते 15 डिसेंबर
महाविद्यालयनिहाय रिक्त प्रवेश – 16 ते 23 डिसेंबर
शैक्षणिक वर्षाला सुरुवात – 6 डिसेंबर
प्रवेशाचा कट ऑफ – 23 डिसेंबर
प्रवेशाची माहिती अपलोड करणे – 24 डिसेंबर