मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. या बंदीविरोधात अक्षेप नोंदविणे किंवा अपील दाखल करण्यासंदर्भात नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगाव मधील पीएफआयच्या सील केलेल्या कार्यालयास नोटीस चिटकवली आहे. मालेगाव मधून दोघांना याप्रकरणी अटक केलेली आहे. बंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या अनलॉफुल अँक्टीव्हीटी प्रतिबंध न्यायाधिकरणाकडे सुनावणी सुरु आहे. बंदी विरोधात हरकत, अपिल दाखल करण्यासंदर्भात न्यायाधिकरणाचे रितेश सिंग यांनी स्थानिक पोलिसांना सोबत घेत ही नोटीस चिटकवली आहे.